Thursday, March 19, 2020

कोरोनायन

आजची वात्रटिका
---------------------------------------
कोरोनायन
नको तिथे नाक खुपसून,
वाटेल तसे शिंकू नका.
स्वच्छतेचे नियम पाळा,
रस्त्यावरती थुंकू नका .
डॉक्टरांचे अपुरे प्रमाण,
अगदी सप्रमाण सिद्ध झाले.
देवळातले देव देवसुद्धा,
देवळातच स्थानबद्ध झाले.
कोरोनाच्या अफवांमुळे,
सर्वत्र अंदाधुंदी आहे !!
चोर आणि सावांसाठी,
कोरोना ही संधी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7240
दैनिक झुंजार नेता
19मार्च2020
----------------------------- --------------
#कोरोना

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...