Tuesday, March 17, 2020

कोरोनाचे अर्थकारण

आजची वात्रटिका
---------------------------------------
कोरोनाचे अर्थकारण
सूचना आणि उपदेशांचा
कल्ला आणि हल्ला आहे.
नोटांचा वापर टाळावा,
बँकेचा रिझर्व्ह सल्ला आहे.
कुणी विदेशातून देशात,
शहरातून गावाकडे पळतोय,
'खेड्याकडे चला' चा अर्थ
आता कोरोनामुळे कळतोय.
कोरोनाचा प्रभाव असा,
सर्वत्र उमटायला लागला !
कोरोना भारताला,
डिजिटल इंडीयाकडे
वेगाने दामटायला लागला !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5749
दैनिक पुण्यनगरी
17मार्च 2020
----------------------------------------

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...