Thursday, March 12, 2020

कोरोना डायलर टोन

आजची वात्रटिका
---------------------------------------
कोरोना डायलर टोन
कोरोनाच्या चाहुलीनेच
काळजाचा ठोका चुकतो आहे.
आतातर प्रत्येकाचा मोबाईल,
चक्क कानामध्ये खोकतो आहे.
कोरोनाला घाबरला नाही,
सांगा असा कोण आहे ?
मोबाईलच्या खोकण्याचे कारण,
कोरोना डायलर टोन आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7232
दैनिक झुंजार नेता
12मार्च2020

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...