Sunday, March 22, 2020

युद्धप्रसंग

आजची वात्रटिका
---------------------------------------
युद्धप्रसंग
अदृश्य अश्या शत्रूशी
आज उघड लढाई आहे.
लोक गाफिल असल्याने,
कोरोनाची चढाई आहे.
रुग्णांची आकडेवारी बघून
भीतीचे गोळे पोटात आहेत.
सध्या निष्काळजी लोकच,
कोरोनाच्या गोटात आहेत.
लढाई जिंकूनही पराभव;
असे मुळीच व्हायला नको !
एका शूद्र विषाणूसाठी,
अपरिमित मोल जायला नको !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5751
दैनिक पुण्यनगरी
22मार्च 2020
----------------------------- --------------
#कोरोना

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...