Saturday, March 14, 2020

विनोदी टुकारपणा

आजची वात्रटिका
---------------------------------------
विनोदी टुकारपणा
जो तो आपल्या टुकारपणावर
भलताच खंबीर असतो.
कुणालाच कसे कळत नाही?
विनोद हा गंभीर असतो.
सगळ्यांच्याच विनोदामधली,
हवा जायला लागली !
टुकार विनोदविरांची अवस्था,
हास्यास्पद व्हायला लागली !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5746
दैनिक पुण्यनगरी
14मार्च 2020

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...