Wednesday, March 18, 2020

कोरोनोपाय

आजची वात्रटिका
---------------------------------------
कोरोनोपाय
बाहेरचे तर सोडूनच द्या,
घरातल्या घरात आता रिस्क आहे.
नवरा आणि बायकोच्याही,
तोंडावरती आता मास्क आहे.
कुणी कुणाचे नसते,
गोष्ट पुन्हा कळून चुकली आहे.
नवऱ्याचा संशय येताच,
बायकोने धूम ठोकली आहे.
आज अखेर तरी कुठे;
जगामध्ये कोरोनोपाय आहे ?
"जगा आणि जगू द्या"
एवढाच काय तो तरोणोपाय आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7239
दैनिक झुंजार नेता
18मार्च2020
----------------------------- --------------
#कोरोना

No comments:

दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 172 वा

दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 172 वा l पाने -39 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/18nApDbukudT7hlNNJ...