Sunday, March 22, 2020

कोरोनाचे साक्षीदार

कोरोनाचे साक्षीदार
अजून तरी जनता,
नको तेवढी गाफील आहे .
म्हणूनच 'जनता कर्फ्यू चे ,
देशवासियांना अपील आहे .
संसर्गाचा वेग गुणाकारात,
मृत्यूचा वेग भागाकारात आहे.
कोरोना चे रूपांतर
मोठ्या हाहा:कारात आहे.
आपण दाखवून देऊ,
गोष्ट खरोखर पटली आहे !
वस्तुस्थितीचा दाखला म्हणून,
चीनच्या जोडीला इटली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7243
दैनिक झुंजार नेता
22मार्च2020
----------------------------- --------------
#कोरोना

No comments:

वडाची साल.. ...