Sunday, April 12, 2020

आपली वज्रमूठ

आजची वात्रटिका
---------------------------------------
आपली वज्रमूठ
आपले धैर्य बघून,
कोरोनाही हादरला पाहिजे.
आपली वज्रमूठ बघून,
कोरोनाही कदरला पाहिजे.
सारे भेदाभेद टाळून,
परस्परांचे आधार होऊ.
विविधतेल्या एकतेचे दर्शन,
कोरोनाला साधार देऊ.
जगा आणि जगू द्या,
यातच माणुसकीचे यश आहे !
कोरोनाही सांगत सुटेल,
च्यायला काय हा देश आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7259
दैनिक झुंजार नेता
12एप्रिल2020
---------------------------- !
#कोरोना

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...