Sunday, April 5, 2020

ग्रुप क्वारंटाईन

आजची वात्रटिका
---------------------------------------
ग्रुप क्वारंटाईन
सुटता सुटता वाढत आहेत,
ते कोरोनाचे वेढे आहेत.
जरा जास्तच वळवळू लागलेले,
अफवांचे विकृत किडे आहेत.
संशयाचे किडे सोडणे,
विकृतांचे विकृत छंद आहेत !
व्हाट्स ऍप ग्रुपचे दरवाजेही,
आता इतरांसाठी बंद आहेत!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7252
दैनिक झुंजार नेता
5एप्रिल2020
-----------------------------------
#कोरोना

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...