Sunday, April 26, 2020

तळीरामांचा तळतळाट

आजची वात्रटिका
-------------------------------------
तळीरामांचा तळतळाट
खाण्याची जशी सोय करता,
तशी पिण्याची सोय करा.
चकणा-बिकणा काही नको,
फक्त चण्याची सोय करा.
तळीरामांच्या या तळतळाटाने,
सगळे दिवस फ्राय डे झाले !
नरडे कोरडे पडल्याने,
कोरोनाचे दिवस 'ड्राय डे' झाले!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5779
दैनिक पुण्यनगरी
26 एप्रिल2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...