Thursday, April 16, 2020

डाव आणि पेच

आजची वात्रटिका
---------------------------------------
डाव आणि पेच
प्याद्या खेळवल्या जातात,
प्याद्या लोळवल्या जातात.
राजा-वझीर हाताशी धरून,
सगळे डाव जुळवल्या जातात.
पराभवाचे पडते सुतक,
विजयाचे धुराळे असतात !
प्याद्यांचे बळी देऊन,
सूत्रधार नामानिराळे असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5769
दैनिक पुण्यनगरी
16एप्रिल2020
----------------------------
#कोरोना

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...