Wednesday, April 8, 2020

होम क्वारंटाईन

आजची वात्रटिका
---------------------------------------
होम क्वारंटाईन
होम क्वारंटाईनचा वेग,
आजकाल ऐन भरात आहे.
पुतण्यामुळे काका,
काकामुळे पुतण्या घरात आहे.
कुठे सुटलेला,कुठे वाढलेला,
नात्या-गोत्याचा गुंता आहे !
आमचा निर-क्षीर विवेक सांगतो,
दोघांनाही जनतेची चिंता आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7255
दैनिक झुंजार नेता
8एप्रिल2020
-----------------------------------
#कोरोना

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...