Saturday, April 11, 2020

सावधान !

आजची वात्रटिका
---------------------------------------
सावधान !
कोरोनाचा हल्ला लपून आहे,
कोरोनाचा हल्ला छपून आहे.
जे जे बेसावध सापडतील,
त्यांच्यावर कोरोना टपून आहे.
तान्ह्या बाळापासून वृद्धांपर्यंत,
कोरोनाला कुणाची दया येत नाही.
आता तर कोरोना स्वतःची,
थोडीही चाहूल लागू देत नाही.
ना प्रार्थना,ना विनंत्या,
कोरोना खूपच निर्दय आहे !
तुम्हांलाच हात जोडून विनंती,
कारण तुम्हांला तरी हृदय आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5764
दैनिक पुण्यनगरी
11एप्रिल2020
-----------------------------------
#कोरोना

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...