Thursday, April 23, 2020

शेअर अँड केअर

आजची वात्रटिका
-------------------------------------
शेअर अँड केअर
जे जे आऊटडोअर होते,
ते ते सर्व काही इनडोअर झाले,
काही काही भटकते आत्मे तर,
सर्वात अधिक बोअर झाले.
तुम्ही बोअर झालात तरी,
इतरांना मात्र बोअर करू नका.
आनंद शेअर करायचा सोडून,
उगीच दुःख शेअर करू नका.
कोरोनाच्या जीवघेण्या संकटाला,
आपण हसत तोंड देऊ शकतो !
आपले धैर्य बघून कोरोनाही,
एक दिवस हतबल होऊ शकतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5776
दैनिक पुण्यनगरी
23 एप्रिल2020
------------------------------------
#कोरोना

No comments:

पक्षांतराचे चक्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- पक्षांतराचे चक्र गेलेले परत यायला लागले, आलेले परत जायला लागले. ज्याच्या त्याच्या पक्षांतराचे, चक्र पूर्...