Monday, April 6, 2020

कोरोनामय जग

आजची वात्रटिका
---------------------------------------
कोरोनामय जग
कोरोना पाहिला जात आहे,
कोरोना गायला जात आहे,
बातम्या-बातम्या मधून कोरोना,
धो-धो वाहयला जात आहे.
कोरोनाच्या वावड्या आहेत,
कोरोनाच्या रेवड्या आहेत.
काही चर्चा खात्रीशीर,
काही मात्र बेवड्या आहेत.
महासत्तेने हात टेकले,
आपली तरी कुठे गय आहे ?
जे जग करुणामय असावे,
तेच जग आज कोरोनामयआहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5759
दैनिक पुण्यनगरी
6एप्रिल2020
-----------------------------------
#कोरोना

No comments:

पुराव्या अभावी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- पुराव्या अभावी.... मोठे मासे नामानिराळे, छोटे मात्र पकडले जातात. कायद्याचे लांब लांब हात, इथे मात्...