Tuesday, April 7, 2020

देशसेवेची संधी

आजची वात्रटिका
---------------------------------------
देशसेवेची संधी
कोरोनाला गो म्हटल्याने,
कोरोना काही जाणारं नाही.
कोरोना मुर्दाबादच्या घोषणांना,
कोरोना काही भिणार नाही.
अफवा पेरू नका,
अफवांचे वाहक ठरू नका.
कोरोनाला तोंड दाखवित,
नाहक बाहेर फिरू नका.
इतर विषय बंद करा,
ते उगीच चिवडू नका !
घरबसल्या आयती आलेली,
देशसेवेची संधी दवडू नका !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5760
दैनिक पुण्यनगरी
7एप्रिल2020
-----------------------------------
#कोरोना

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...