Thursday, April 30, 2020

साथी हात बढाना..

आजची वात्रटिका
-------------------------------------
साथी हात बढाना..
आता आयुष्यातून कोरोनाला,
सहज वगळता येणार नाही
घट्ट पाय रोवल्याशिवाय,
कोरोना काही जाणार नाही.
आज आहे तसे उद्याचे,
आयुष्यही कोरोनामय असेल.
वर्तमान कोरोनामय आहे,
भविष्यही कोरोनामय असेल.
वास्तवाचा स्विकार करणे,
हेच आपल्या हाती असेल !
नव्या संकटांना तोंड देताना,
कोरोनाच आपला साथी असेल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5783
दैनिक पुण्यनगरी
30एप्रिल2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...