Tuesday, April 28, 2020

खतर 'नाक' भविष्य

आजची वात्रटिका
-------------------------------------
खतर 'नाक' भविष्य
मास्क बांधता बांधता,
नाकी नऊ यायला लागले.
कुणाकुणाची नाकं तर,
चपटे व्हायला लागले.
कोरोना गेल्यानंतर त्याच्या
कटू आठवणी शेष असतील !
मास्कमुळे चीन प्रमाणे नकटे,
जगात अनेक नवे देश असतील !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5781
दैनिक पुण्यनगरी
28एप्रिल2020
-----------------------------------
#कोरोना

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...