Tuesday, April 7, 2020

भान जरासे राहू द्यारे

आजची वात्रटिका
---------------------------------------
भान जरासे राहू द्यारे
ज्याला त्याला स्वातंत्र्य होते,
दिवा लावा वा दिवा लावू नये.
समर्थक आणि विरोधकामुळे,
कोरोनाचे मात्र फावू नये.
समर्थन आणि विरोध
करून झाले असेल तर,
जरा भानावर यायलाच पाहिजे !
वाद-विवाद चालू ठेवण्यासाठी,
कोरोना तर जायलाच पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7253
दैनिक झुंजार नेता
6एप्रिल2020
-----------------------------------
#कोरोना

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...