Monday, April 20, 2020

सबकुछ ऑनलाईन

आजची वात्रटिका
-------------------------------------
सबकुछ ऑनलाईन
ऑनलाईनच्या जमान्यात,
ऑफलाईन सती आहे.
ऑनलाईन व्यबहाराला,
कोरोनाकडून गती आहे.
बारसे आणि अंत्यविधीही
ऑनलाईन साजरे आहेत !
ऑनलाईन लग्न झालेल्यांचे,
चेहरे प्रचंड लाजरे आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7263
दैनिक झुंजार नेता
20एप्रिल2020 

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...