Tuesday, April 14, 2020

अपेक्षाभंग

आजची वात्रटिका
---------------------------------------
अपेक्षाभंग
धक्क्यावरती धक्के,
कोरोनालाच धक्के आहेत.
प्रत्यक्ष कोरोनाच्या कपाळी,
जाती-धर्माचे शिक्के आहेत.
जो तो आपला स्वार्थ,
संकटातही साधीत आहे.
प्रत्यक्ष कोरोनाच,
इथे जाती-धर्माने बाधीत आहे.
असे काही होण्याची शक्यता,
कोरोनालाही वाटली नसेल !
भारतात जशी फाटली,
तशी त्याची कुठेच फाटली नसेल !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7261
दैनिक झुंजार नेता
14एप्रिल2020
---------------------------------------
#कोरोना

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...