Wednesday, April 29, 2026

भाटगिरी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
भाटगिरी
मीडिया ते सोशल मीडिया,
जिकडे तिकडे भाटच भाट आहेत.
भाटांची चाटूगिरी बघून,
सगळेच्या सगळेच चाट आहेत.
आधुनिक भाटांच्या भाटगिरीला,
आज तंत्रज्ञानाचा आधार आहे.
लाईक कॉमेंट्स कॉपी पेस्टचा खेळ,
कधी रोख तर कधी उधार आहे.
भाटांची भाटगिरी म्हणजे,
भाट सवयीचे गुलाम आहेत !
बारा महिने तेरा त्रिकाळ,
भाटांचे उगवत्याला सलाम आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9262
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
29 एप्रिल 2026

 

No comments:

भाटगिरी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- भाटगिरी मीडिया ते सोशल मीडिया, जिकडे तिकडे भाटच भाट आहेत. भाटांची चाटूगिरी बघून, सगळेच्या सगळेच च...