Showing posts with label तू-तू-मैं-मै. Show all posts
Showing posts with label तू-तू-मैं-मै. Show all posts

Tuesday, October 27, 2026

तू-तू-मैं-मै... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका


आजची वात्रटिका 
-----------------------

तू-तू-मैं-मै

वाघाच्या नखांनी म्हणे,
कमळ पाकळ्या फाटू लागल्या.
युतीच्या फारकतीच्या,
आवया उठू लागल्या.

सत्तासुंदरीपुरतीच,
ज्यांची त्यांची यारी असते!
अपयशाचे बाप होण्यासाठी, 
कुणाचीच तयारी नसते !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
 मोबाईल.9923847269
-------------------------
चिमटा l 26 ऑक्टोबर  2004 
दैनिक  पुण्यनगरी

बदनामीचे अस्त्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------- बदनामीचे अस्त्र एकदा सगळे पर्याय संपले की, बदनामीचे अस्त्र बाहेर काढले जाते. लोकांच्या डोळ्यात धुळ फेकू...