Showing posts with label बदनामीचे अस्त्र. Show all posts
Showing posts with label बदनामीचे अस्त्र. Show all posts

Tuesday, October 27, 2026

बदनामीचे अस्त्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
बदनामीचे अस्त्र
एकदा सगळे पर्याय संपले की,
बदनामीचे अस्त्र बाहेर काढले जाते.
लोकांच्या डोळ्यात धुळ फेकून,
बदनामीच्या जाळ्यात ओढले जाते.
एकदा बदनामीचा डाग लावला की,
कुणालाही सहज एकटे पाडले जाते.
पहिला धुराळा खाली बसेपर्यंत,
बदनामीचे नवे अस्त्र सोडले जाते.
जसे संशयाच्या भुताला,
कधीच नीट गाडलेले नाही !
तसे बदनामीच्या मायावी अस्त्राने,
भल्या भल्यांनाही सोडलेले नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9440
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
27ऑक्टोबर 2026

 

बदनामीचे अस्त्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------- बदनामीचे अस्त्र एकदा सगळे पर्याय संपले की, बदनामीचे अस्त्र बाहेर काढले जाते. लोकांच्या डोळ्यात धुळ फेकू...