Tuesday, September 30, 2025
अरे देवा !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
अरे देवा !
निसर्गाची खेळी अशी की,
अगदी होत्याचे नव्हते होऊन गेले.
कुठे देवळं पाण्याखाली,
कुठे कुठे तर देवच वाहून गेले.
ज्याचा केला जातो धावा,
त्याचीच महापुरात धावाधाव आहे.
तो खरंच आहे की नाही?
शंकेला पुन्हा नव्याने वाव आहे.
महापूरग्रस्त माणसांसारखे,
जणू त्यालाही तेवढेच भेव होते !
जे जे आले प्रत्यक्ष मदतीला,
ते ते खरोखरच माणसातले देव होते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9051
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
30सप्टेंबर2025
Monday, September 29, 2025
दैनिक वात्रटिका l 29सप्टेंबर 2025वर्ष- पाचवेअंक -114वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 29सप्टेंबर 2025
वर्ष- पाचवे
अंक -114वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1DVjJm6Y4woxTw09HNc1TG0U2kqg1hcC3/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 184
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
पावसाच्या अंधश्रद्धा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
पावसाच्या अंधश्रद्धा
पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धा आहेत,
तशा थांबविण्याच्याही अंधश्रद्धा आहेत.
श्रद्धा काय किंवा अंधश्रद्धा काय ?
त्यांना आपल्या मर्यादासुद्धा आहेत.
महाराष्ट्रात पाऊस थांबविण्यासाठी,
सध्या तरी हीच नेमकी वेळ आहे.
पावसाच्या अंधश्रद्धा म्हणजे,
आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ आहे.
पाऊस थांबविण्याच्या करामती,
कदाचित आता केल्या जाऊ शकतात !
पुरोगामी महाराष्ट्र अंधश्रद्धा संपन्न आहे,
याच्याही कल्पना आता येऊ शकतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9050
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29सप्टेंबर2025
Sunday, September 28, 2025
दैनिक वात्रटिका l 28सप्टेंबर 2025वर्ष- पाचवेअंक -113वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 28सप्टेंबर 2025
वर्ष- पाचवे
अंक -113वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1rj4zmj3CweUrkpcDVbS0ABuEQezq8fCH/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 183
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
मराठवाडा वॉटर ग्रीड...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
मराठवाडा वॉटर ग्रीड
दुष्काळी मराठवाड्याचा इतिहास,
अतिवृष्टीने बदलून टाकला आहे.
रांगड्या मराठवाड्याचा भूगोलही,
अतिवृष्टीने कुदलून टाकला आहे ?
मराठवाड्याचे कोरडे दुःख,
महापुरात ओले होऊन वाहू लागले.
मराठवाड्यातील कवी लोक,
आता महापुराच्या कविता लिहू लागले.
इथली पोकळ राजकीय इच्छाशक्ती,
आता जणू निसर्गाने जाणली आहे !
मराठवाडा वॉटर ग्रीड योजना,
निसर्गानेच प्रत्यक्षात आणली आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9049
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28सप्टेंबर2025
Saturday, September 27, 2025
गाव गाड्या चा रोष.... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका
उलटे गणित....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
उलटे गणित
अंधश्रद्धा मिरवल्या जात आहेत,
अंधश्रद्धा श्रद्धा ठरवल्या जात आहेत.
अशिक्षितांपेक्षाही सुशिक्षितांकडून,
अंधश्रद्धेचे धडे गिरवल्या जात आहेत.
जशा अंधश्रद्धा मिरवल्या जातात,
तसे त्यांचे उदात्तीकरण केले जाते.
असल्या नसलेल्या सुशिक्षितपणाचे,
अंधश्रद्धांकडून हरण केले जाते.
सत्याचा आरसा दाखवील त्याच्या,
माथी नास्तिकतेचा टिळा असतो !
तमाम अंधश्रद्धांना मात्र,
अस्तिकतेचा पक्का लळा असतो !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9048
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
27सप्टेंबर2025
Friday, September 26, 2025
नवरंगाच्या साड्या.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
नवरंगाच्या साड्या.....
रंगवेड्या आणि रंगबावऱ्यांना,
मी सांगू कसे आणि काय?
गाणे मात्र मनात घुमू लागले,
नवरंगाच्या साड्या नेसली येडामाय.
आम्हाला जे सांगायचे आहे,
त्यांच्या डोक्यात शिरेल काय ?
चला त्यांच्यासाठी गाणे म्हणू,
नवरंगाच्या साड्या नेसली येडामाय.
त्यांनी व्यर्थ ठरवला ज्योतिबा,
त्यांनी व्यर्थ ठरवली सावित्री आय !
गाणे किती सूट होतेय..
नवरंगाच्या साड्या नेसली येडामाय !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9047
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26सप्टेंबर2025
Thursday, September 25, 2025
दैनिक वात्रटिका l 25सप्टेंबर 2025वर्ष- पाचवेअंक -110 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 25सप्टेंबर 2025
वर्ष- पाचवे
अंक -110 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1SjA8rNRBRKH9JMLOgUse5OyZaLGkAs0s/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 181
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
मदतीची जाहिरात...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
मदतीची जाहिरात
कुणी खरोखर मदत केली,
कुणी फक्त मदतीची बात केली.
ज्याला जशी जमेल तशी त्याने,
आपल्या मदतीची जाहिरात केली.
मदतीपेक्षा राजकारणाचाच,
जिकडून तिकडून सूर आहे.
मदतीच्या जाहिरातीचाच,
सोशल मीडियावर महापूर आहे.
आधी केले,मग सांगितले,
आम्हालाही भूमिका मान्य आहे !
टिचभर करून हातभर सांगतात,
त्यांची मात्र खरोखर धन्य आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9046
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
25सप्टेंबर2025
Wednesday, September 24, 2025
नुकसानीचा पंचनामा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Tuesday, September 23, 2025
इच्छुकांच्या हालचाली.... आजची वात्रटिका
Monday, September 22, 2025
भाषिक मुलामा
-------------------
भाषिक मुलामा
कुणी कुणाची आई काढतो आहे,
कुणी कुणाचा बाप काढतो आहे.
जमेल तेवढ्या शिवराळ शब्दात,
जो तो एकमेकांचे माप काढतो आहे.
कुठपर्यंत खाली घसरावे ?
याचीही मर्यादा ठेवली जात नाही.
शाकाहारी शब्दांमध्ये काही,
त्यांची प्रतिक्रिया मावली जात नाही.
आपला फाटक्या तोंडाचा असला तरी,
त्याच्या योग्यतेचा ढोल बडवला जातो !
गाव गाड्याकडच्या भाषेचा,
शिवराळतेला मुलामा चढवला जातो !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9043
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22सप्टेंबर2025
Sunday, September 21, 2025
दैनिक वात्रटिका l 20सप्टेंबर 2025वर्ष- पाचवेअंक -109 वा l पाने -57
दाखला नको,नोंद घ्या.... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका
निरोप समारंभ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Saturday, September 20, 2025
विरोधाभास...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Friday, September 19, 2025
दैनिक वात्रटिका l 19सप्टेंबर 2025वर्ष- पाचवेअंक -108 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 19सप्टेंबर 2025
वर्ष- पाचवे
अंक -108 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1Ce0Lytd5jSFDnhujeukc8rkfewdLxuVo/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 178
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
नव्या ट्रेंडची भूक....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
नव्या ट्रेंडची भूक
याच्याकडून त्याला सेंड होतो,
त्याच्याकडून याला सेंड होतो.
अधून मधून कधीकधी,
हमखासपणे नवा ट्रेंड येतो.
ट्रेंडच्या नादी लागून लागून,
दुनिया नक्की पोळली जाते
दुनिया आभासी असो वा खरी,
ती नव्या ट्रेंडला भाळली जाते.
कुणालाच समजत नाही,
काय बरोबर काय चूक असते?
जमाना बदलत असला तरी,
त्याला नव्या ट्रेंडची भूक असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9040
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19सप्टेंबर2025
Thursday, September 18, 2025
दैनिक वात्रटिका l 18सप्टेंबर 2025वर्ष- पाचवेअंक -106 आणि 107 वा l पाने -69
दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 18सप्टेंबर 2025
वर्ष- पाचवे
अंक -106 आणि 107 वा l पाने -69
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/11sIe9IE6dBYyn_8qXm39mcqfzxSzBZ2Y/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 177
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
क्रेडिट कार्ड ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Wednesday, September 17, 2025
आरक्षणाची कमाल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
आरक्षणाची कमाल
विविधतेतील एकता गेली,
एकतेतील विविधता गेली.
एवढी सगळी कमाल,
आरक्षणाच्या मागण्यांनी केली.
आरक्षणाचा फेरा आहे.
कानी आरक्षणाचा वारा आहे
हम सब एक है....
धोक्यात जुनाच नारा आहे.
जाती पातीच्या चष्म्यामधून,
आरक्षित अशी तुलना आहे !
अमानवी भेदभावाला,
सुरक्षित अशी चालना आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9038
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17सप्टेंबर2025
Tuesday, September 16, 2025
दैनिक वात्रटिका l 16सप्टेंबर 2025वर्ष- पाचवेअंक -105 वा l पाने -57

बहुरंगी पाऊस...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
बहुरंगी पाऊस
पाऊस गाताड,पाऊस पेताड,
तो पेताडासारखे पडून दाखवतो.
त्याची आभाळमाया फुटली की,
पाऊस आभाळ फाडून दाखवतो.
पाऊस खट्याळ,पाऊस खोडील,
पाऊस रातवा धरून दाखवतो.
पाऊस पक्का लहरी महंमद,
लहर येताच कहर करून दाखवतो.
पाऊस सुसाट,पाऊस पिसाट,
पाऊस वादळावरती स्वार होतो !
पाऊस भरतो धरित्रीची ओटी,
भुईचाच मग भुईला भार होतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9037
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
16सप्टेंबर2025
Monday, September 15, 2025
गॅझेट म्हणाले गॅझेटला.... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका
दैनिक वात्रटिका l 15 सप्टेंबर 2025वर्ष- पाचवेअंक -103 वा l पाने -54

सामाजिक अस्थिरता.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
सामाजिक अस्थिरता
प्रत्येक सत्ताधाऱ्यांना नेहमीच,
समाज स्थिर वाटत असतो.
प्रत्येक विरोधकांना नेहमीच,
समाज अस्थिर वाटत असतो.
स्थिरतेचे आणि अस्थिरतेचे,
ज्याचे त्याचे वेगळे नियम असतात.
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचेही,
नियम तर कधीच कायम नसतात.
जेव्हा विरोधक आणि सत्ताधारी,
एकमेकांना भिडल्या जातात !
अधून मधून सामाजिक अस्थिरतेच्या,
पुड्या हमखास सोडल्या जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9036
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
15सप्टेंबर2025
Sunday, September 14, 2025
दैनिक वात्रटिका l 13 सप्टेंबर 2025वर्ष- पाचवेअंक -102 वा l पाने -54

राजकीय कित्ता ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
राजकीय कित्ता
फाटाफुटीशिवाय एकी नाही,
एकीशिवाय फाटाफुट नाही.
जुळवाजुळवी झाल्याशिवाय
राजकारणात ताटातूट नाही.
एकीचे आणि बेकीचेही
परस्परांशी अतूट नाते आहे.
नाती गोत्यात आली की,
रोज त्याचे दर्शन होते आहे.
जी जोडते आणि तोडतेही,
तिचेच तर नाव सत्ता आहे !
वर्तमानाकडून भूतकाळाचा,
पुन्हा पुन्हा राजकीय कित्ता आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9035
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
14सप्टेंबर2025
Saturday, September 13, 2025
दैनिक वात्रटिका l 12 सप्टेंबर 2025वर्ष- पाचवेअंक -101 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 12 सप्टेंबर 2025
वर्ष- पाचवे
अंक -101 वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1pzr6Ayx0eTFx3bfqxJDzPHmkbXbtKPWC/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 173
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
फुट - पट्टी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
फुट - पट्टी
कुठे ढासळतो बुरुज,
कुठे खिंडार पडले जाते.
भगदाडातून कुणी बाहेर,
कुणाला आत ओढले जाते.
जसे कुणी कच्चे असतात,
तसे कुणी पक्के असतात.
खाली भूकंपाचा केंद्रबिंदू,
वर भूकंपाचे धक्के असतात.
पक्षांतर आणि पक्षफुटीला,
अशीच काहीशी फुटपट्टी असते !
फोडाफोडी आणि जोडाजोडी,
यांची राजकीय गट्टी असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9034
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
13 सप्टेंबर2025
Friday, September 12, 2025
ब्रेक के बाद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
काळजीचे काही कारण नाही
-------------------
काळजीचे काही
कारण नाही
कसल्या तरी नशेमध्ये,
इथला तरुण गुंगवला आहे.
कसल्या तरी दंगलीमध्ये,
इथला तरुण दंगवला आहे.
आटा महाग,डाटा स्वस्त,
इथला तरुण व्यस्त आहे.
उगवत्याला सलाम येथे,
रोज विद्रोहाचा अस्त आहे,
नेपाळ लुटले,फ्रान्स पेटले,
त्यांची तरुणाईवर भिस्त आहे !
काळजीचे काही कारण नाही,
इथला तरुण मस्त आणि सुस्त आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9033
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12 सप्टेंबर2025
Thursday, September 11, 2025
दैनिक वात्रटिका l 11 सप्टेंबर 2025वर्ष- पाचवेअंक -100 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 11 सप्टेंबर 2025
वर्ष- पाचवे
अंक -100 वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/13kUefWNgSNVYy0fxfZpAgkyuMD37378e/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 171
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
विकृत बॅनर वॉर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
विकृत बॅनर वॉर
यांच्या उरावर त्यांची,
त्यांच्या उरावर यांची बॅनरबाजी आहे.
बॅनरच्या डिजिटल निष्ठेवरती,
आज-काल जो तो राजी आहे.
पूर्वी बॅनर लावण्याची स्पर्धा होती,
आता बॅनर फाडण्याची स्पर्धा आहे.
यांच्या बॅनरला त्यांचे बॅनर,
आता रोजच नडण्याची स्पर्धा आहे.
जमेल तिथे आणि जमेल तसा,
डिजिटल बॅनरचा बार आहे !
विकृतीकडून विकृतीकडे ,
जात असलेले बॅनर वॉर आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9032
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11 सप्टेंबर2025
Wednesday, September 10, 2025
दैनिक वात्रटिका l 10 सप्टेंबर 2025वर्ष- पाचवेअंक -99 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 9 सप्टेंबर 2025वर्ष- पाचवेअंक -98 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 9 सप्टेंबर 2025
वर्ष- पाचवे
अंक -98 वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1bFm-5I0yQSEixZVJQLpgsi5vkGT1Y_Wj/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 169
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
ऑपरेशन फोडाफोडी
आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...
-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...



















