Sunday, September 7, 2025

घातक स्पर्धा... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका


साप्ताहिक 
वात्रटिका 
---------------------

घातक स्पर्धा

जगातील लोकांत  स्पर्धा, 
कोण कुणापेक्षा सरस आहे?
आपल्या भारतीय लोकात मात्र,
मागास होण्यासाठी चुरस आहे.

मागासाकडून अतिमागासाकडे,
ही तर उलटीच वाटचाल आहे.
मागास व्हायची चुरस वाढली,
जो तो म्हणतो माझीच लाल आहे.

मागास व्हा,अतिमागास व्हा,
सगळे कसे एकदम झकास आहे !
तुमचा विकास म्हणजेच,
आपल्या देशाचाही विकास आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
---------------------
साप्ताहिक सरकारनामा 
6सप्टेंबर 2025

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...