Monday, September 8, 2025

खग्रास चंद्रग्रहण 2025...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
खग्रास चंद्रग्रहण 2025
पौर्णिमाच बनली अमावस्या,
जणू चांदण्याही थरथरल्या होत्या.
एका मंतरलेल्या रात्री मध्येच,
सगळ्या चंद्रकला अवतरल्या होत्या.
कुणासाठी चंद्र काळवंडलेला,
कुणासाठी चंद्र लालभडक होता.
कुणाचा ग्रहणकाल मोकळा चाकळा,
कुणाचा ग्रहणकाल कडक होता.
त्याच्याही चंद्राला ग्रहण लागले होते,
तिच्याही चंद्राला ग्रहण लागले होते !
त्यांच्याच डोक्यात प्रकाश पडला,
ज्यांनी कुणी अंधश्रद्धेला त्यागले होते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9029
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
8 सप्टेंबर2025
---------------------------
नमस्कार,
मराठी वात्रटिका

 

No comments:

राज्यसभेची तुतारी .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- राज्यसभेची तुतारी विलीनीकरण होणार की नाही? प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा आहे. त्यांच्या टारगेटव...