Wednesday, September 17, 2025

आरक्षणाची कमाल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

आरक्षणाची कमाल

विविधतेतील एकता गेली,
एकतेतील विविधता गेली.
एवढी सगळी कमाल,
आरक्षणाच्या मागण्यांनी केली.

आरक्षणाचा फेरा आहे.
कानी आरक्षणाचा वारा आहे
हम सब एक है....
धोक्यात जुनाच नारा आहे.

जाती पातीच्या चष्म्यामधून,
आरक्षित अशी तुलना आहे !
अमानवी भेदभावाला,
सुरक्षित अशी चालना आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9038
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17सप्टेंबर2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...