Saturday, September 27, 2025

गाव गाड्या चा रोष.... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका



साप्ताहिक 
वात्रटिका
--------------------------

गाव गाड्याचा रोष

ते बोलतात अचकट विचकट,
सांगतात गाव गाड्याची भाषा आहे.
त्यांनी गावगाड्याची बदनामी थांबवावी,
गावागाड्यांकडून प्रेमळ आशा आहे.

कुणी मुजोरी आणि असंस्कृतपणा,
गाव गाड्याच्या नावाने खपवू नका.
कुणी आपले फाटके तुटके तोंडही,
गाव गाड्याच्या आड लपवू नका.

हा दोष गाव गाड्याच्या भाषेचा नाही,
हा सारा तुमच्या संस्काराचा दोष आहे !
अत्यंत सभ्य भाषेत सांगतोय,
हा आमच्या गाव गाड्याचा रोष आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
साप्ताहिक सरकारनामा
27सप्टेंबर 2025

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...