आजची वात्रटिका
-------------------
फुट - पट्टी
कुठे ढासळतो बुरुज,
कुठे खिंडार पडले जाते.
भगदाडातून कुणी बाहेर,
कुणाला आत ओढले जाते.
जसे कुणी कच्चे असतात,
तसे कुणी पक्के असतात.
खाली भूकंपाचा केंद्रबिंदू,
वर भूकंपाचे धक्के असतात.
पक्षांतर आणि पक्षफुटीला,
अशीच काहीशी फुटपट्टी असते !
फोडाफोडी आणि जोडाजोडी,
यांची राजकीय गट्टी असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9034
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
13 सप्टेंबर2025

No comments:
Post a Comment