आजची वात्रटिका
-------------------
रडू लागली पोरं सोरं,
रडू लागल्या शाळा.
निरोपाच्या समारंभाला,
सोशल मीडियाच्या झळा.
थोडेफार वास्तव असेल,
बाकी कट पेस्ट एडिट आहे.
ओथंबलेल्या भावभावनांचे
सोशल मीडियाला क्रेडिट आहे.
स्टेटस,स्टोरी,रिल्स आणि पोस्टला,
निरोप समारंभाचीच नशा आहे !
तरीही भावनिक प्रश्न ओठी येतो,
मग गुणवत्तेची का वाईट दशा आहे ?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9042
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21सप्टेंबर2025

No comments:
Post a Comment