Friday, September 5, 2025

अभिनंदन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

अभिनंदन

जे जिंकले त्यांचे हे अभिनंदन,
जे हरले त्यांचेही अभिनंदन आहे.
स्पर्धेत उतरलेल्या,न उतरलेल्या,
सर्व आदर्शांना मनापासून वंदन आहे.

ज्यांनी वाटले त्यांचेही अभिनंदन,
ज्यांनी लाटले त्यांचेही अभिनंदन आहे.
ज्यांनी ज्यांनी हात जोडून,
पाय चाटले त्यांचेही अभिनंदन आहे.

ज्यांना पुरस्कार मान सन्मान वाटतो,
ज्यांच्यासाठी पुरस्कार म्हणजे बंधन आहे !
ज्यांच्यामुळे पुरस्कारांचा तिरस्कार होतो,
आशा सर्वच आदर्शांचे अभिनंदन आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9027
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
5 सप्टेंबर2025
 

No comments:

घुसखोरी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- घुसखोरी खोटे खोटे बोलत रहा, खरे बोलायचीही चोरी आहे. हल्ली जिकडे बघावे तिकडे, घुसखोरी एके घुसखोरी...