आजची वात्रटिका
-------------------
राजकीय कित्ता
फाटाफुटीशिवाय एकी नाही,
एकीशिवाय फाटाफुट नाही.
जुळवाजुळवी झाल्याशिवाय
राजकारणात ताटातूट नाही.
एकीचे आणि बेकीचेही
परस्परांशी अतूट नाते आहे.
नाती गोत्यात आली की,
रोज त्याचे दर्शन होते आहे.
जी जोडते आणि तोडतेही,
तिचेच तर नाव सत्ता आहे !
वर्तमानाकडून भूतकाळाचा,
पुन्हा पुन्हा राजकीय कित्ता आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9035
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
14सप्टेंबर2025

No comments:
Post a Comment