आजची वात्रटिका
-------------------
पावसाच्या अंधश्रद्धा
पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धा आहेत,
तशा थांबविण्याच्याही अंधश्रद्धा आहेत.
श्रद्धा काय किंवा अंधश्रद्धा काय ?
त्यांना आपल्या मर्यादासुद्धा आहेत.
महाराष्ट्रात पाऊस थांबविण्यासाठी,
सध्या तरी हीच नेमकी वेळ आहे.
पावसाच्या अंधश्रद्धा म्हणजे,
आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ आहे.
पाऊस थांबविण्याच्या करामती,
कदाचित आता केल्या जाऊ शकतात !
पुरोगामी महाराष्ट्र अंधश्रद्धा संपन्न आहे,
याच्याही कल्पना आता येऊ शकतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9050
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29सप्टेंबर2025

No comments:
Post a Comment