आजची वात्रटिका
-------------------
नव्या ट्रेंडची भूक
याच्याकडून त्याला सेंड होतो,
त्याच्याकडून याला सेंड होतो.
अधून मधून कधीकधी,
हमखासपणे नवा ट्रेंड येतो.
ट्रेंडच्या नादी लागून लागून,
दुनिया नक्की पोळली जाते
दुनिया आभासी असो वा खरी,
ती नव्या ट्रेंडला भाळली जाते.
कुणालाच समजत नाही,
काय बरोबर काय चूक असते?
जमाना बदलत असला तरी,
त्याला नव्या ट्रेंडची भूक असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9040
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19सप्टेंबर2025

No comments:
Post a Comment