Friday, September 26, 2025

नवरंगाच्या साड्या.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

नवरंगाच्या साड्या.....

रंगवेड्या आणि रंगबावऱ्यांना,
मी सांगू कसे आणि काय?
गाणे मात्र मनात घुमू लागले,
नवरंगाच्या साड्या नेसली येडामाय.

आम्हाला जे सांगायचे आहे,
त्यांच्या डोक्यात शिरेल काय ?
चला त्यांच्यासाठी गाणे म्हणू,
नवरंगाच्या साड्या नेसली येडामाय.

त्यांनी व्यर्थ ठरवला ज्योतिबा,
त्यांनी व्यर्थ ठरवली सावित्री आय !
गाणे किती सूट होतेय..
नवरंगाच्या साड्या नेसली येडामाय !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9047
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26सप्टेंबर2025
 

No comments:

घुसखोरी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- घुसखोरी खोटे खोटे बोलत रहा, खरे बोलायचीही चोरी आहे. हल्ली जिकडे बघावे तिकडे, घुसखोरी एके घुसखोरी...