Tuesday, September 2, 2025

स्वार्थाचा भावार्थ ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

स्वार्थाचा भावार्थ

जो आपल्यासारखा विचार करेल,
तोच आपल्याला आपला वाटू लागतो.
आपल्या दुराग्रहाला विरोध करणारा,
आपल्याला विरोधक म्हणून भेटू लागतो.

आपल्याच दुराग्रहाला,
आपण आग्रह असे सोयीचे नाव देतो.
आपल्या टाळीला टाळी देईल,
नेमका त्यालाच आपणही भाव देतो.

ज्याच्या त्याच्या स्वार्थाला स्वार्थ,
स्वार्थासाठीच हवा द्यायला लागतो !
ज्याच्या त्याच्या स्वार्थाचा भावार्थ,
म्हणूनच समजून घ्यायला लागतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-9024
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
2 सप्टेंबर2025
 

No comments:

विश्वास अविश्वास....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------- विश्वास अविश्वास सत्तेसाठी साम-दाम-दंड-भेदाचे, सगळेच्या सगळे मार्ग धुंडले जातात. निवडून आलेले...