Thursday, September 18, 2025

क्रेडिट कार्ड ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
क्रेडिट कार्ड
ना अपवाद मतदार संघ,
ना अपवाद ग्रामपंचायत वार्ड असते.
ज्याच्या त्याच्या हातामध्ये,
आपल्या सोयीचे क्रेडिट कार्ड असते.
कधी भडकून घेतले जाते,
कधी इतरांना भडकवले जाते.
जसे क्रेडिट कार्ड फडकवले जाते,
तसे गळ्यात उगीच अडकवले जातात.
क्रेडिटची आयडिया जेवढी हास्यास्पद,
तेवढीच आयडिया भलती सलती आहे !
उद्याचे काही माहिती नाही,
सध्या तरी क्रेडिट कार्डची चलती आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9039
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
18सप्टेंबर2025

 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...