Sunday, September 21, 2025

दाखला नको,नोंद घ्या.... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका





साप्ताहिक 
वात्रटिका 
------------------------

दाखला नको,नोंद घ्या

"कमी बुद्धीचे लोक....."
आरोप तर सरळसोट आहे.
अध्यक्षपदाच्या नमनालाच,
नव्या वादाचे गालबोट आहे.

आपल्या शब्दांचा झाडा आहे, 
आपल्या शब्दांची झडती आहे.
साहित्य संमेलनाच्या वादांची, 
कमानसुद्धा पुन्हा चढती आहे.

ज्याचे सामान्यीकरण होईल,
असे वादग्रस्त मत नको आहे!
आपल्या हाताने आपल्याच, 
प्रतिमेचे 'पानिपत' नको आहे ! !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
----------------------------------
साप्ताहिक सरकारनामा 
  20सप्टेंबर  2025

No comments:

घुसखोरी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- घुसखोरी खोटे खोटे बोलत रहा, खरे बोलायचीही चोरी आहे. हल्ली जिकडे बघावे तिकडे, घुसखोरी एके घुसखोरी...