आजची वात्रटिका
-------------------
विसर्जन सोहळा
आपल्या हाताने आपल्या,
श्रद्धेचा बोजवारा उडवला जातो.
पुढच्या वर्षी लवकर या म्हणीत,
तो दरवर्षीच बुडवला जातो.
प्रत्येक वर्षीचे प्रसंग,
पहिल्यापेक्षा ताणाचे असतात.
कुणी आपले बिन मानाचे,
तर कुणी कुणी मानाचे असतात.
भक्तांकडून आपल्या भाविकतेचे,
ओंगळवाणे दर्शन घडवले जाते !
मानाचा असो वा बिन मानाचा,
सर्वांनाच हमखास बुडवले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-9030
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9 सप्टेंबर2025

No comments:
Post a Comment