Tuesday, September 16, 2025

बहुरंगी पाऊस...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

बहुरंगी पाऊस

पाऊस गाताड,पाऊस पेताड,
तो पेताडासारखे पडून दाखवतो.
त्याची आभाळमाया फुटली की,
पाऊस आभाळ फाडून दाखवतो.

पाऊस खट्याळ,पाऊस खोडील,
पाऊस रातवा धरून दाखवतो.
पाऊस पक्का लहरी महंमद,
लहर येताच कहर करून दाखवतो.

पाऊस सुसाट,पाऊस पिसाट,
पाऊस वादळावरती स्वार होतो !
पाऊस भरतो धरित्रीची ओटी,
भुईचाच मग भुईला भार होतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9037
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
16सप्टेंबर2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...