आजची वात्रटिका
----------------------------
इच्छुकांच्या हालचाली
नेमकी निवडणुकांच्या तोंडावर,
तमाम इच्छुकांना जाग येऊ लागते.
आपण चर्चेत राहण्यासाठी,
काहीतरी करणे भाग होऊ लागते.
जयंती,पुण्यतिथी,वाढदिवस,
यांनाच मग वेठीला धरले जात असते.
आपल्या उमेदवारीचे बीज,
लोकांच्या मनात पेरले जात असते.
ज्याची मिळेल त्याची उमेदवारी,
मिळेल त्याचा हाती झेंडा धरला जातो !
फिल्डिंग लावूनही विकेट गेली की,
त्याचा कंड मात्र नक्की जिरला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9044
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
23सप्टेंबर2025
No comments:
Post a Comment