आजची वात्रटिका
-------------------
भाषिक मुलामा
कुणी कुणाची आई काढतो आहे,
कुणी कुणाचा बाप काढतो आहे.
जमेल तेवढ्या शिवराळ शब्दात,
जो तो एकमेकांचे माप काढतो आहे.
कुठपर्यंत खाली घसरावे ?
याचीही मर्यादा ठेवली जात नाही.
शाकाहारी शब्दांमध्ये काही,
त्यांची प्रतिक्रिया मावली जात नाही.
आपला फाटक्या तोंडाचा असला तरी,
त्याच्या योग्यतेचा ढोल बडवला जातो !
गाव गाड्याकडच्या भाषेचा,
शिवराळतेला मुलामा चढवला जातो !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9043
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22सप्टेंबर2025

No comments:
Post a Comment