Saturday, September 20, 2025

विरोधाभास...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
विरोधाभास
कर्त्याची नाही तर नाकर्त्याचीच,
रोज कीर्ती होताना पाहतो मी.
फक्त बाजार बसव्यांचीच,
रोज आरती होताना पाहतो मी.
ज्यांनी पाहिली दिवास्वप्ने,
त्यांचीच स्वप्नपूर्ती होताना पाहतो मी.
जे फसवतात इतरांना,
त्यांचीच भरती होताना पाहतो मी.
ज्यांनी नाकारला देखावा,
त्यांची अपकीर्ती होताना पाहतो मी !
जे पुसायच्याही लायकीचे नाहीत,
त्यांचीच मूर्ती होताना पाहतो मी !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9041
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
20सप्टेंबर2025

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...