आजची वात्रटिका
-------------------
देव महात्म्य
दानपेटीतल्या आकड्यावरती,
देवाचे महत्त्व मानले जाते.
देवाला मोठे करण्यासाठीच,
देवाला बाजारात आणले जाते.
भक्तांच्या भक्ती भावापेक्षा,
देवाचा बाजार भाव मोजला जातो.
जिथले दानपेटीचे आकडे मोठे,
तोच भक्तिभावाने भजला जातो.
जागृत आणि निद्रिस्ततेचा अर्थ,
इथे भक्तीनुसार लावला जातो !
फक्त जागृत देवच म्हणे,
भक्तांच्या नवसाला पावला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-9026
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
4 सप्टेंबर2025

No comments:
Post a Comment