Friday, September 12, 2025

काळजीचे काही कारण नाही

आजची वात्रटिका
-------------------

काळजीचे काही
कारण नाही

कसल्या तरी नशेमध्ये,
इथला तरुण गुंगवला आहे.
कसल्या तरी दंगलीमध्ये,
इथला तरुण दंगवला आहे.

आटा महाग,डाटा स्वस्त,
इथला तरुण व्यस्त आहे.
उगवत्याला सलाम येथे,
रोज विद्रोहाचा अस्त आहे,

नेपाळ लुटले,फ्रान्स पेटले,
त्यांची तरुणाईवर भिस्त आहे !
काळजीचे काही कारण नाही,
इथला तरुण मस्त आणि सुस्त आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9033
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12 सप्टेंबर2025
 

No comments:

विश्वास अविश्वास....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------- विश्वास अविश्वास सत्तेसाठी साम-दाम-दंड-भेदाचे, सगळेच्या सगळे मार्ग धुंडले जातात. निवडून आलेले...