Wednesday, September 3, 2025

प्रवर्गांतर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
प्रवर्गांतर
नामविस्तार झाला;नामांतर झाले,
आता प्रवर्गांतर होणे सुरू आहे.
तोडगे आणि उपाय कसे काढायचे?
यासाठी प्रत्येकाचा एक गुरु आहे.
आरक्षणाच्या प्राप्तीसाठी,
जातीभेदाला कुठे थारा आहे?
हम सब एक है....
जातीबरोबर प्रवर्गाचाही नारा आहे.
सगळ्यांचीच वंशावळ सांगते,
इथे कुणीसुद्धा ऐरे गैरे नाहीत?
कागदोपत्री असले तरी,
ते प्रत्यक्षात सोयरे धायरे नाहीत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-9025
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
3 सप्टेंबर2025

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...