Saturday, September 6, 2025

शुद्ध कौटुंबिक हेतू ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

शुद्ध कौटुंबिक हेतू

राज्यसभेत तू ,लोकसभेत मी,
सगळा आनंदी आनंद आहे.
विधानसभेत दादा आणि भाऊ,
वहिनीला म्हणते ती नणंद आहे.

बाप केंद्रात,पोरगा राज्यात,
लोकशाहीवर प्रसंगच बाका आहे.
पंचायत समितीत पुतण्या तर,
जिल्हा परिषदेमध्ये काका आहे.

मागच्या दाराने आजीआजोबा,
पुढून नात आणि नातू आहे !
लोकशाही प्रगल्भ करण्याचा,
कुटुंबा कुटुंबाचा शुद्ध हेतू आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-9028
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
6 सप्टेंबर2025
 
 

No comments:

राज्यसभेची तुतारी .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- राज्यसभेची तुतारी विलीनीकरण होणार की नाही? प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा आहे. त्यांच्या टारगेटव...