साप्ताहिक
वात्रटिका
-----------------------------
गॅझेट म्हणाले गॅझेटला
तुझ्या माझ्या जोडीला,
दररोज कुणीतरी येतो आहे.
त्यांच्या नोंदीच्या पुराव्यासाठी,
आज आपली नोंद घेतो आहे.
इतिहासाबरोबर वर्तमान,
आरक्षणाने ढवळून टाकला आहे
लोकशाही व्यवस्थेमध्ये,
आपला राजेशाही दाखला आहे.
कशासाठी झाला आपला जन्म?
आज कशासाठी आपला वापर आहे?
त्यांच्या विजयाचे आणि पराभवाचेही,
आपल्याच डोक्यावर खापर आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
13सप्टेंबर 2025
No comments:
Post a Comment