Tuesday, September 30, 2025

अरे देवा !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

अरे देवा !

निसर्गाची खेळी अशी की,
अगदी होत्याचे नव्हते होऊन गेले.
कुठे देवळं पाण्याखाली,
कुठे कुठे तर देवच वाहून गेले.

ज्याचा केला जातो धावा,
त्याचीच महापुरात धावाधाव आहे.
तो खरंच आहे की नाही?
शंकेला पुन्हा नव्याने वाव आहे.

महापूरग्रस्त माणसांसारखे,
जणू त्यालाही तेवढेच भेव होते !
जे जे आले प्रत्यक्ष मदतीला,
ते ते खरोखरच माणसातले देव होते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9051
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
30सप्टेंबर2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...